Chinchwad : ५ हजार कामगारांना अत्यावशक सुरक्षा साधनांचे वाटप

कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित वाटप सोहळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड़ शहर व उपनगरातील बांधकाम कामगारांना अत्यंत महत्वाचे, असे अत्यावश्यक व सुरक्षा साधनांचे आज चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, चंद्रकांत कुभार, महिला उपाध्यक्षा ज्योती कदम, धर्मेंद्र पवार, भास्कर राठोड, शेषेराव गायकवाड,  रज्जक सय्यद, नसिमा पठाण, रुक्मिणी थोरात, रेखा उकिरड़े, रेशमा देवकर, महावीर कांबळे, सुमित्रा राठोड, मुक्ता पवार, संजीवनी सरावदे, लालू राठोड, मंजुळा जाधव आदी बांधकाम कामगार आदी उपस्थित होते.

वाटप केलेल्या साधनामध्ये मोठी स्टील पेटी, हेल्मेट, हातमोजे, सेफटी बेल्ट, पाणी बोटल, जेवणाचा डबा, चटई, बैटरी, मास्क, पिशवी, मच्छर दाणी इअर प्लग याचा सामावेश होता.

यावेळी नखाते म्हणाले की शहरातील व विविध भागातील मोठ मोठ्या आस्थापने व मोठ्या साईटवर  काम करणारे सर्वच प्रकारचे कामगार, बांधकाम कामगार यांनी मालक व पर्यवेक्षक यांचेकडे  स्वत:ची सुरक्षा व कायद्यानुसार नोंदणी या दोन महत्वाच्या बाबींचा आग्रह धरावा तसेच आज व यापूर्वी आता महामंडळाकडून मिळालेल्या या सर्व साधने टाळाटाळ न करता व घरी न ठेवता सुरक्षा सधानांचा वापर करणे गरजचे आहे. अन्यथा मोठ्या अपघातातून मोठी हानी  होऊ शकते. प्रसंगी प्राण जाऊ शकतो यासाठी आपल्या सुरक्षेची काळजी  घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आपल्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यावी.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या माध्यमातून विविध लाभ देण्यात येत आहेत. दोन वर्षापासून महासंघाच्या माध्यमातून अनेक वेळा विशेष अभियान राबवून मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आले. यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, ओमप्रकाश यादव आमदार महेश लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रस्तावना बालाजी इंगळे यांनी सूत्रसंचालन किशोर कदम यांनी तर आभार वंदना थोरात यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.