BNR-HDR-TOP-Mobile

Maval : इंगळूनच्या महादेवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

एमपीसी न्यूज – आंदर मावळमधील इंगळून येथील महादेवी माध्यमिक विदयालयातील विद्यार्थ्यांना सौजन्य सेवा फाऊंडेशन श्री दत्त चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवारी (दि.31) सायकल वाटप करण्यात आले. 

एच आर मॅनेजर सुधीर पाटील साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी ट्रस्टचे रामदासजी वाडेकर, दैनिक सकाळचे पत्रकार संकेत जगताप,  दैनिक प्रभातचे पत्रकार, इंगळून पारिटेवाडी ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना आठ ते नऊ किमी आंतर पायी जावे लागत असल्याने मुलांचा दररोजचा वेळ वाचावा, त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा व विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी. या उद्देशाने विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3