Dighi : नवजीवन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

एमपीसी न्यूज – दिघी येथील नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड प्राथमिक, पूर्वप्राथमिक, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

दिघी येथील कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, धर्मादायचे अध्यक्ष दिलीप देशमुख, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, नगरसेविका निर्मला गायकवाड,  प्रौढ व निरंतर शिक्षण संचनालयाचे  डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय आयुक्त  दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर सायकल पूजन करण्यात आले. दिलीप देशमुख महाराष्ट्र शासन यांच्या सरकारी योजनेअंतर्गत व उदय गायकवाड नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सतत पाठपुराव्यामुळे व सहकार्याने विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. दत्तात्रय गायकवाड यांनी विद्यालयाचे प्रास्ताविक केले. उदय गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.