Vadgaon News : आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप

एमपीसीन्यूज : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे मित्र परिवाराच्या वतीने वडगाव मावळ येथील शहरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात नगरपंचायत कर्मचार्‍यांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळेस LED टिव्ही भेट देण्यात आला.

प्रभाग क्रमांक १७ मधील गरजू कुटुंबांतील मुला-मुलींना ड्रेसचे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

मोरया महिला प्रतिष्ठान व उडाण फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आशादीप काॅम्प्युटर क्लास यांच्या सहकार्याने गरजू मुली व महिलांसाठी १ महिन्याकरिता काॅम्प्युटर कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी सभापती गणेश ढोरे, ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे, सुभाष जाधव, माजी उपसरपंच तुकाराम उर्फ बुवा ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सुरेश कुडे, गंगाराम ढोरे, चंदुकाका ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नितीन भाबंळ, बाळासाहेब निकम, बाळकृष्ण ढोरे, किसनराव वहिले, सुनिल शिंदे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा अबोली ढोरे, उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री ठाकूर, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूजा वहिले, सायली महाळस्कर, ज्योती जाधव, मिनाक्षी ढोरे, शिक्षिका छाया जाधव, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, प्रविण ढोरे, बजरंग ढोरे, गणेश पं ढोरे, गणेश महाळस्कर, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.