Talegaon Dabhade : ठाकर वस्तीमधील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप 

0

एमपीसी न्यूज : सर्वसामान्य व्यक्तींचीही दिवाळी आनंददायी होण्यासाठी मावळ तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमाटणे येथील ठाकर वस्तीमधील कुटुंबांना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवाळी फराळ करण्यात आले.   

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान फराळ मिळावा म्हणून दिवाळी फराळ वाटप उपक्रम खासदार सुप्रिया सुळे तसेच जिल्हा अध्यक्षा पुजा बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

यावेळी मावळ तालुका युवती अध्यक्षा निशा पवार, उपाध्यक्ष अमृता नवले, सरचिटणीस वर्षा अंबोले, तळेगाव शहर अध्यक्षा  शिवानी सोनवणे, तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे, माधुरी गाडे उपस्थित होत्या. याप्रसंगी निशा पवार व वैशाली दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवानी सोनवणे यांनी केले तर आभार अमृता नवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III