Sangvi : महेश मंडळ व महेश प्रोफेशनल फोरम यांच्याकडून मराठी प्राथमिक शाळेस शैक्षणिक साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदा ही सांगवी परिसर महेश मंडळ व महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवडच्या वतीने सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळा व कै. धोंडिबा यशवंतराव टण्णू विद्यालयातील गरजू व होतकरू अशा २३० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये कंपासपेटी, वह्या, स्केच पेन, पेन्सिल आदींचा समावेश होता.

या शालेय साहित्याचे वितरण श्रीनिवास करावा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक सदानी यांनी मंडळातर्फे होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मंडळामार्फत देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर नक्कीच मुले करतील असे मत मुख्याध्यापिका कल्पना सोनावणे यांनी केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया व महेश प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष अभिषेक सदानी, सत्यनारायण बांगड, सचिन मंत्री, प्रसन्न राठी, मनोज मालपाणी, संपत सोमाणी, गजानंद बिहानी, गणेश चरखा आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नवले यांनी केले तर आभार सुनील दरेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.