Pimpri : पूरग्रस्त देवडे गावातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

एमपीसी  न्यूज – पुण्यातील मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, शिवप्रहार संघटना आणि मराठा टायगर फोर्सकडून वाळवा तालुक्यातील देवर्डे गावच्या पुरग्रस्त नागरिकांना जीवनाश्यक साहित्याचे आज (शनिवार) वाटप करण्यात आले. यामध्ये किराणा साहित्य, काही कपडे, लहान मुलाचे साहित्य, महिलांना आरोग्य दृष्टीने लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने महापुराची स्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. सरकार मदत आणि बचाव कार्य करतच आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था देखील या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. या पूरग्रस्तांना आपलीही काही मदत व्हावी, याकरिता अनेक नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत.

देवर्डे गावातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करताना सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष, साप्ताहिक माणदेश प्रबोधनचे संपादक मोहन शिंदे, देवर्डे गावचे सरपंच दीपक पाटील, उपसरपंच विलास पाटील, माजी उपसरपंच राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक सहदेव पाटील, नानासो पाटील, विक्रम पाटील, रमेश जाधव, जालिंदर पाटील यांच्यासह पूरग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.