Nigdi news: आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्य वाटप

एमपीसी न्यूज – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसा निमित्त निगडी ओटा स्कीम परिसरातील गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे अनेक नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लॉकडाउनमुळे गोरगरिबांचे मोठे हाल झाले आहेत.  निगडी ओटा स्कीम परिसरातील कुटुंबाना संस्कृती सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी उद्योजक विकिशेठ बोऱ्हाडे, उद्योजक संदीप गर्जे ,उद्योजक राहुल चंदेल , ऊर्जा फाउंडेशनचे किरण खोजे ,अमर देशमुख इतर कार्यकर्ते उपास्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.