Dehu: चिंचोली गावातील 100 गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप

Distribution of free food grains to 100 needy families in Chincholi village in pimpri chinchwad

एमपीसी न्यूज – देहूरोड ग्रामीण विभागातील चिंचोली येथे 100 गरजू कुटुंबाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येकी तीन किलो गहू व तीन किलो तांदूळ असे सहा किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहूल सपकाळे, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा रंजना सपकाळे यांनी चिंचोली गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन धान्याचे वाटप केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी, देहूरोड शहर काँग्रेस अध्यक्षा ज्योती वैरागर, चिंचोली राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सविता जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, देहूरोड शिवसेना शहर उपप्रमुख संदीप बालघरे, चिंचोली गाव वॉर्ड काँग्रेस अध्यक्षा ग्रेसी, पोलीस पाटील मारुती वैरागर, मिलिंद भालशंकर, विजय ढावरे, अंकुश गायकवाड, पितांबर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. गरजू कुटुंबापर्यंत ही मदत पोचण्यासाठी युवासेनेचे गणेश घोलप यांची विशेष मदत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.