Vadgaon Maval News : आरोग्य शिबिरात वारंगवाडीमधील नागरिकांना हेल्थकार्डचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात आरोग्य तपासणी केल्यानंतर नागरिकांना हेल्थकार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी विभागीय अध्यक्ष ह.भ.प. दीपक वारिंगे, ग्राम प्रतिनिधी ह भ प गोविंद सावले, ह भ प बाळोबा वारिंगे, सोनाली शेलार, प्रेमलता गद्रे, प्रिया सिस्टर, सोमनाथ ब्रदर, सरपंच संगीताताई घोजगे, माजी उपसरपंच भरत घोजगे, उद्योजक समीर जाधव, माजी सरपंच वामन वारिंगे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कलावडे, ग्रामपंचायत सदस्य सारिका धुमाळ, उद्योजक रामनाथ धुमाळ, ग्रामस्थ भिवाजी सावले, चंद्रकांत वारिंगे, शिवाजी वारिंगे, रावजी वारिंगे ,संतोष खोंडगे, एकनाथ नखाते, मच्छिंद्र टेकळे, वरसु नखाते, सिताराम धुमाळ,आरोग्य शिबीरास अंगणवाडी सेविका रंजना मोरे, कांताबाई खोंडगे ,रमेश खोंडगेसह गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ व स्पर्श हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ह भ प नंदकुमार भसे व डॉ. अमित वाघ यांच्या संकल्पनेतून वारंगवाडी या ठिकाणी ‘आपले मावळ निरोगी मावळ’ हे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.  त्यामध्ये 112 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्य हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने व गावाच्या वतीने दत्तात्रय वारिंगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.