Vadgaon Maval : आदिवासी भागातील नागरिकांना रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्या, मेडिकल औषधांचे वाटप

 एमपीसी न्यूज:  आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंदर मावळ मधील अतीदुर्गम आदिवासी भागातील कळकराई या ठिकाणी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप तसेच ग्रामस्थांना मिठाई वाटप व  रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्या,मेडिकल औषधांचे वाटप केले. 

सरपंच दत्ता पडवळ, सावळा गावचे सरपंच नामदेव गोंटे, सदाशिव ढोंगे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सावळा,शंकर बोऱ्हाडे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड मावळ तालुका, ग्रा.पं.सदस्य भरत साबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कावळे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर मतदार संघ अध्यक्ष अविनाश बधाले, मावळ तालुका सोशल मीडिया प्रमुख मंगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आमदार शेळके यांनी दूरध्वनी वरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या वेळी बोलतना माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तूचे वाटप करावे किंवा गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे आव्हान केले त्याच प्रमाणे लवकरच आपल्या सर्वांना भेटण्यासाठी येणार असल्याचे ते म्हणाले. भविष्यकाळात आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास मला आपला मोठा भाऊ समजून कधीही फोन करा मी ती गरज स्वखर्चाने पुर्ण करेल असे सरपंच दत्ताआण्णा पडवळ म्हणाले.

 या वेळी सखाराम लाकडे,संजय कावळे,आशाबाई तळपे,किसन काठे, शांताराम कावळे,संतोष कोकाटे आणि स्वयंभु फाऊंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र नामदेव काठे प्रास्ताविक चंद्रकांत तळपे यानी केले आभार ग्रा.पं सदस्य भरत साबळे यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.