Chinchwad : तहसील आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  

एमपीसी न्यूज –  नगरसेवक नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून आयोजित तहसील आपल्या दारी मोफत कॅम्प या उपक्रमात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी गरीब विद्यार्थी पालकांना आज (शुक्रवारी) मोफत उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 17 मधील रहिवाशी नागरिकांसाठी तहसील आपल्या दारी हा मोफत कॅम्प राबविण्यात येत आहे.  कॅम्पला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये, 340 अर्जांची नोंद झाली असून 80 उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात तहसीलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अंकुश आटोळे, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, चिंचवड तलाठी अर्चना रोकडे, आकुर्डी तलाठी शांता वानखेडे, कोतवाल रविंद्र जगताप यांच्या नियंत्रणात उत्पन्नाचा दाखला देण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांना एकाच छताखाली उत्पन्नाचा दाखला, तसेच आवश्यक कागदपत्रे मिळावे, या हेतून आज आणि उद्या मोफत कॅम्प राबविण्यात येत आहे. तसेच, याठिकाणी ऑनलाईन आरटीई फार्म देखील भरून देण्यात येत आहे.  शासनाचे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सर्वसामान्यांसाठी खाजगी शाळेत 25% गरीब मुलांसाठी राखीव असलेल्या जागांसाठी प्रवेश मिळावा, या करीता तहसिलदारांचा उत्पनाचा दाखला महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी दाखला काढून घेण्याचे आवाहन ढाके यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, विशेष कार्यकारी अधिकारी शंकर पाटील, रविंद्र ढाके, शुभम ढाके, प्रदिप पटेल, माऊली जगताप, तुषार नेमाडे, राकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश महाजन, वसंत नारखेडे, दर्शन महाजन, कैलास रोटे, कुशल नेमाडे, मनोज ढाके, राहुल पाचपांडे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.