Theargaon News : संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीतर्फे गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ वाटप

0

एमपीसी न्यूज: संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने थेरगाव येथील गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ वाटप करण्यात आले असून महापुरुषांचे विचार मुला-मुलींना सांगून प्रबोधन करण्यात आले. (दि. 13) रोजी हा कार्यक्रम पार पडला.

पुरूषोत्त्म खेडेकर, मनोज आखरे (प्रदेश अध्यक्ष), चंद्रशेखर घाडगे (संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हाकार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रितेश भुजबळ, विद्यार्थी आघाडी जिल्हासंघटक आदित्य सोनवणे, विद्यार्थी आघाडी सरचिटणीस यश उंबरे व विद्यार्थी आघाडीचे इतर सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.