Pune News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धायरीत शोभिवंत फुलझाडांचे वाटप

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने भाजपच्या शहर पर्यावरण समितीने धायरी मधील धर्मावत नगर येथे असलेल्या सुंदर संस्कृती या वसाहतीत शहर भाजपच्या पर्यावरण शाखेतर्फे शोभिवंत फुलांच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे वृक्ष प्राधिकरणाचे सभासद तसेच भाजपच्या शहर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष संदीप काळे, शिवाजीनगर येथील नगरसेवक आदित्य माळवे, सरचिटणीस धर्मेश राजपूत, चिटणीस निर्विकार मोरे, डॉ. चंद्रकांत विचारे, गिरीश काळे, सुंदर संस्कृतीचे सदस्य विजय इंगळे, निकते जकातदार, सुमेधा काळे कुलकर्णी, श्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शहर भाजपच्या पर्यावरण शाखेचे उपाध्यक्ष विनीत वाटवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला सुंदर संस्कृती या वसाहतीतील रहिवाशांनी अत्यंत उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी नागरिकांचे आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.