Pune: सिंहगड रस्ता परिसरातील नाभिक व्यावसायिकांना पीपीई किटचे वाटप

Distribution of PPE kits to saloon traders in Sinhagad road area कोरोना महामारीमुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गेली तीन महिने नभिक व्यवसायावर (केशकर्तन) सरकारने बंदी घातली होती. दि. २८ जूनपासून योग्य ती सुरक्षा खबरदारी घेवून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्ता परिसरातील नाभिक व्यावसायिकांना भाजपचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या हस्ते स्वामी बॅग्ज निर्मित पीपीई किट वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गेली तीन महिने नभिक व्यवसायावर (केशकर्तन) सरकारने बंदी घातली होती. दि. २८ जूनपासून योग्य ती सुरक्षा खबरदारी घेवून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.

त्या पार्श्वभूमीवर प्रसन्न जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सिंहगड रस्ता परिसरातील नाभिक व्यावसायिकांना व्यावसायिक व ग्राहक यांची सुरक्षा व्हावी यासाठी स्वामी बॅग्ज निर्मित मोफत पीपीई किट वाटप करण्यात आले.

विठ्ठल मंदिर, सिहगड रोड भागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप, प्रमुख पाहुणे संघटक सरचिटणीस राजेश पांडे, खडकवासला भाजप युवा अध्यक्ष सचिन मोरे, नितीन भुजबळ, सूर्यकांत भोसले, राहुल जोशी, सुरेश देशमुख आदि मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व नाभीक व्यावसायिक उपस्थित होते.

राजेश पांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा समाजोपयोगी उपक्रम असल्याचे संगितले. राहुल जगताप यांनी पीपीई किट उत्तम दर्जाचे व लॅब टेस्टेड असल्याचे संगितले.

दरम्यान, रविवार पासून नाभिक समाज बांधवांनी आपापली दुकाने उघडली. फिजिकल डिस्टन्स, मास्क लावून, सॅनिटायजरचा वापर करून व्यवसाय सुरू करण्यात आला. यावेळी नागरिकही गर्दी न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत असल्याचे चित्र दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.