Pimpri : नाट्यछटा स्पर्धेचे सोमवारी पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि महाअंतिम सोहळा (सोमवार दि. 12 ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे.

नाट्यछटा स्पर्धेचे यंदाचे 28 वे वर्ष असून पिंपरी-चिंचवड विभागातील 4 केंद्रांवर 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 600 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ (दि. 12 ) सकाळी दहा वाजता संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि वनस्थळीच्या व्यवस्थापक कल्पना गुणाकी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड विभागातील सर्व बक्षीस विजेत्या नाट्यछटांचे सादरीकरण दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी आणि पिंपरी-चिंचवड केंद्राच्या स्पर्धा प्रमुख माधुरी ओक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.