Pimpri : पूरग्रस्तांना रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचा मदतीचा हात, साडेतीनशे ब्लँकेटचे वाटप

तीन हजार लोकांना दिले जेवण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पूरग्रस्तांना 350 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच स्थलांतरित केलेल्या तीन हजार नागरिकांना जेवण देण्यात आले.

चिंचवड, लक्ष्मीनगर आणि वाकड येथील पुराने बाधित झालेल्या नागरिकांना शुक्रवारी (दि. 9) सकाळी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, सचिव सचिन पारेख, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विजय तारक, गजानन चिंचवडे, जसविंदर सोकी उपस्थित होते.

आठ दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या अनेक घरांना बसला आहे. सात हजार नागरिकांचे स्थलांतर केले होते. पुरामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे 350 पूरग्रस्तांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

तसेच स्थलांतरित केलेल्या तीन हजार पूरग्रस्त नागरिकांना जेवण देण्यात आले. काळेवाडीतील संजय गांधीनगर, पिंपरीतील नव महाराष्ट्र विद्यालय, भाटनगर स्कूल, सुभाषनगर येथील नागरिकांना जेवण देण्यात आले आहे.

रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश अगरवाल म्हणाले, ”अतिवृष्टी झाल्याने आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उघड्यावर आला आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे. ब्लँकेट वाटप आणि जेवण देऊन आम्ही खारीचा वाटा उचलला आहे. माणुसकीच्या भावनेतून पूरग्रस्त बांधवांना मदत करावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.