Pune News : भाऊबीज निमित्त 200 देवदासी महिलांना साडी वाटप 

एमपीसी न्यूज – भाऊबीज निमित्त एक साडी बहिणीसाठी हा उपक्रम राबवत देवदासी महिलांना साडी वाटप करून अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. कर्तव्य सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 

पुण्याच्या रेडलाईट भागातील महिलांवर कोरोना संकटाचा प्रभाव पडला असून येथील देवदासी महिलांना याचा फटका बसला आहे. एक हात मदतीचा म्हणून देवदासी महिलांची ही दिवाळी सुखाची व्हावी याच उद्देशाने मंगळवारी (दि.17) एक साडी बहिणीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत 200 महिलांना साडी वाटप करण्यात आली.

याप्रसंगी करणसिंह बांदल, फर्जंद व फत्तेशिकस्त या सिनेमांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सुश्रृत मंकणी,  बिपीन सुर्वे, गणेश खुटवड फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सावंत, कर्तव्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे, उपाध्यक्ष अलका गुजनाळ, करणसिंह मोहिते , अभिजीत चव्हाण, सागर डोंगरे, अक्षय नवगिरे आदि मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.