Chinchwad : गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपाडा ता. कर्जत जि. रायगड आणि मॉंसाहेब मिना ठाकरे माध्यमिक विद्यालय खरवई ता. खालापूर जि. रायगड या शाळेमधील एकूण ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप केले.
वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, दप्तर, कंपासपेटी, पट्या, खोडरबर आणि खेळणी आदी साहित्याचे वाटप केले. यावेळी जि. प. शाळा देवपाडाचे मुख्याध्यापक रोहीदास हाजी आडे विषय शिक्षक दिलीप दुंदू गोतारणे, उपशिक्षक नवनाथ श्रीपती ढाणे आणि मिना ठाकरे माध्यमिक विद्यालय खरवईचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि पालक उपस्थित होते. हे साहित्य फेसबुक आणि वॉटसपच्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यां प्राजक्ता रुद्रवार, रुपाली नामदे, मंजुषा रत्नपारखी यांनी साहित्त्य जमा करण्यासाठी मदत केली.  प्रतिष्ठान २५ सभासदांनी वह्यांसाठी मदत केली. डॉ मोहन गायकवाड, भरत शिंदे, भाऊसाहेब मातणे, मिलन गायकवाड, सुनिता गायकवाड, कविता वाल्हे, सुनंदा निक्रड , किशोर सणस यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.