Alandi : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमानवाडीतील शाळेत शालेय साहित्यांचे वाटप

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 82 वा वाढदिवस या निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस शशिकांत घुंडरे यांनी दि.12 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळगाव येथील हनुमानवाडीच्या शाळेला टेबल, खुर्ची, विद्यार्थ्यांना पुस्तके, शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

PCMC: शहरवासीयांनो, प्रारूप विकास योजनेसाठी मत नोंदवा; महापालिकेचे आवाहन

यावेळी शिक्षिका सुमन चातुरे,शिक्षिका यामिनी लाड,ज्ञानदेव चातुरे आणि शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. याबाबत माहिती प्रसाद बोराटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.