Pune News: पुणे जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने कोरोना विषाणूच्या थैमानाने आर्थिक टंचाईने होरपळून निघालेल्या समाजातील बांधवांना व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने कोरोना विषाणूच्या थैमानाने आर्थिक टंचाईने होरपळून निघालेल्या समाजातील बांधवांना व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

श्री केत्तेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे संस्थापक अध्यक्ष, दलितमित्र पांडुरंग आप्पा करपे, कराड यांच्या सौजन्याने शालेय बॅग, पुणे जिल्हा बुरुड समाज कार्यकारणी अध्यक्ष प्रशांत हादगे, सरचिटणीस नितीन सुर्यवंशी यांच्या वतीने वही, कंपास पेटी, पाणी बॉटल, मास्क, फूलस्केप वह्या, रंग पेटी इतर साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष उमेश साळुंके, मंडई विभाग अध्यक्ष पप्पू जगताप, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल घोरपडे, विशाल हादगे, गोपी घोरपडे, श्रीनाथ सुर्यवंशी, सचिन सावंत, अमोल साळुंके, अनिल पवार, देविदास पवार, विठ्ठल मोहिते, योगेश पवार (कार्याध्यक्ष, हडपसर), राजू सौन्दणकर (अध्यक्ष, धनकवडी), ओंकार रोहिटे (सरचिटणीस, पिंपरी चिंचवड), गणेश सोनावणे (पिंपरी चिंचवड), चेतन पवार (मंडई) व समाज बांधव उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका  विभागातही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा बुरूड समाजाचे मार्गदर्शक महेंद्र पळसे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.