Constitution Day: पिंपळे निलख येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानानिमीत्त पिंपळे निलख येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रं 52 येथे शनिवारी (दि.26) भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी नगरसेविका आरती चोंधे आणि भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या माध्यमातून विद्यार्थांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुमारे साडे आठशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा अनुसूचित जाती आघाडीचे सहसंयोजक केवल जगताप यांनी केले होते.यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल, रबर, स्केल, शार्पनर वाटप करण्यात आले.

Pune News: उदयनराजे हतबल होऊच शकत नाहीत, त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचल्या – देवेंद्र फडणवीस

यावेळी कार्यक्रमाला संकेत चोंधे, प्रदीप जगताप, शौबित घाडगे, पवन कामठे, अमित कांबळे, विवेक जगताप, आकाश वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थिती होते.

यावेळी बोलताना संकेत चोंधे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यासाठीच 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.