Morwadi News : नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य, टू व्हीलर लर्निंग लायसन्सचे वाटप

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

दत्तनगर, विद्यानगर, लाल टोपीनगर, इंदिरानगर, टिपू सुलताननगर मोरवाडी, शाहूनगर ,संभाजीनगर या परिसरात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. पाच हजार पेक्षा जास्त वह्यांचे वाटप प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन करण्यात आले. त्याचबरोबर टू व्हीलर लर्निंग लायसन्स अत्यंत  माफक दरात जवळजवळ दीडशे लोकांना देण्यात आले. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वृक्षारोपण, अनाथालय यांना मदत, वह्या वाटप व लर्निंग लायसन्स चे वाटप आदी उपक्रम करण्यात आले.

याप्रसंगी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर ,नगरसेविका कमल घोलप ,माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजप  प्रदेश सचिव अमित गोरखे, बी. के. कोकाटे , सय्यद पटेल , आरपीआयचे  दादा शिरोळे , राम शिरोळे  व  कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी  अजित भालेराव, संभाजी नाईकनवरे, राम लोंढे,  अमोल कुचेकर,  मिलिंद कांबळे , नागेश राठोड, विशाल पवार, अविनाश शिंदे, ओंकार गायकवाड, निलेश सोनावणे ,  प्रशांत शिंदे , प्रीतम तेलंगे यांनी मेहनत घेतली .

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.