Vadgaon Maval – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीनचे वाटप

एमपीसी न्यूज – वडगाव मावळमधील 52 महिलांना वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला जाणार असून महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
या उपक्रमांसाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे लकी ड्रॉ द्वारे  52 महिलांना शिलाई मशीन तर इतर सहभागी महिलांना विशेष आकर्षक भेट वस्तू दिल्या जाणार आहेत.याबाबतची माहिती मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर (आप्पा) म्हाळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. 7) वडगाव येथे होणार आहे.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळ भाजपाचे कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, सरचिटणीस मकरंद बवरे, अतुल म्हाळसकर, माजी अध्यक्ष किरण भिलारे, ॲड विजय जाधव,नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, दीपक भालेराव, वडगाव शहर युवक भाजपा अध्यक्ष विनायक भेगडे, शंकर भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
https://youtu.be/6W51bJ6_UU0
वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्स येथे रविवारी (दि.7) दुपारी 2 वाजता महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे, उपाध्यक्षा चित्रा वाघ, पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुल व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी वडगाव शहर, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
17 प्रभागातील  महिलांना जवळपास दोन हजार कुपनचे वाटप झाले असून प्रत्येक प्रभागातील महिलांकरीता एक बाॅक्स याप्रमाणे सतरा प्रभागांसाठी 17 बाॅक्स तयार केले असून प्रत्येक बाॅक्समधून फक्त तीनच कुपन काढून प्रत्येक प्रभागात तीन भाग्यवान महिला लकी ड्रॉ च्या मानकरी ठरणार आहेत. याप्रमाणे 17 प्रभागात 52 महिलांभगिनी लकी ड्रॉ द्वारे भाग्यवान मानकरी ठरणार आहेत. उर्वरित सहभागी महिलांना विशेष आकर्षक भेट वस्तू दिली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.