Alandi: आळंदी येथील अनाथ मुलांना अल्पोपहाराचे वाटप

Distribution of snacks to orphans in Alandi

एमपीसी न्यूज- आळंदी येथील अनाथ मुलांना अल्पोपहाराचे आज (दि.1) वाटप करण्यात आले. दिवंगत आम्मा जंगलदास सुखवानी यांच्या स्मरणार्थ या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र सर्वधर्म पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मागासवर्गीय समाज महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे, मंदाकिनी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे आणि जिल्हा नाशिक सटाणा तालुकाप्रमुख कुमार अहिरे यांनी अल्पोपहार वाटपाचे काम पार पाडले.

यासाठी मंदाकिनी कांबळे यांनी स्वतः अल्पोपहार तयार केला होता. तयार केलेला स्वादिष्ट अल्पोपहार देवाची आळंदी येथे असणाऱ्या अनाथाश्रमातील मुलांना वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.