Talegaon Dabhade News : प्रजासत्ताक दिनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाई वाटप

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव स्टेशन भागात विविध ठिकाणी मिठाई वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिली. 

भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारीला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगाला कोविडच्या साथीने विळखा घातला होता. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या जवळचे अनेकजण दगवल्याचे पाहिले होते. गेली दोन वर्षे संपूर्ण जग लॉकडाऊन मुळे हतबल झाले होते.गेली दोन वर्षे कोविड काळात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे व त्यांचे कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावून समाजसेवा व रुग्णसेवा करीत होते.

“या जगावरील करोनाचे संकट लवकरात लवकर हटावे व जगामध्ये मानवी चैतन्य पुन्हा बहरून यावे, यासाठी जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी मिठाई वाटप करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी नमूद केले.

जनसेवा विकास समिती 26 जानेवारीला सकाळी 9 वाजल्यापासून खालील ठिकाणी मिठाईचे वाटप करणार आहे.

१) तळेगाव स्टेशन चौक

(ओसीया मेडिकल समोर)

२)विरचक्र मंडळ चौक , यशवंत नगर.

३) मराठा क्रांती चौक , सिंडिकेट बँक

४) जनसेवा वाचनालय , इंद्रायणी महाविद्यालया समोर

५)मनोहर नगर, बालाजी मार्बल समोर

मिठाई हे केवळ निमित्त असून कोरोनारुपी भस्मासूराचा वध व्हावा व पुन्हा जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेली प्रार्थना असून सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.