_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने विशेष पोलीस अधिकारी यांना टी-शर्ट वाटप  

एमपीसी न्यूज – पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन मावळ येथील विशेष पोलीस अधिकारी यांना टी- शर्टचे वाटप करण्यात आले.

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या काळात बंदोबस्त करणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी यांना समाजात ओळखले जावे यासाठी एकाच रंगाचे 20 टी शर्टचे वाटप केले.

पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन चिंचवडे व  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव आदींनी विशेष पोलीस अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष  प्रवीण मुऱ्हे, मावळ तालुकाध्यक्ष अतुल भेगडे, मावळ महिला तालुकाध्यक्षा रुपाली दाभाडे, तळेगाव शहर अध्यक्ष  सोमनाथ त्रिम्बके, तळेगाव दाभाडे कार्याध्यक्ष बजरंग रंधवे, लोणावळा शहर अध्यक्ष संजय मांढरे, चाकण शहर अध्यक्ष संजय पुरी, विशेष पोलीस अधिकारी निलेश गराडे, शंकर जंगम, गणेश निसाळ, गणेश ढोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ महिला अध्यक्ष रुपाली दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन देहूरोड शहर अध्यक्ष  लक्ष्मण शेलार यांनी केले. पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रवीण मुऱ्हे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.