Pimpri : उध्दवश्री पुरस्काराचे वितरण बुधवारी

जॉनी लिव्हर यांचा विशेष सत्कार 

एमपीसी न्यूज – उध्दवश्री पुरस्कार सोहळा समितीच्यावतीने दिले जाणारे उध्दवश्री पुरस्कार येत्या बुधवारी दि. 29 ऑगस्टला दिला जाणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या  व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यावेळी दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांच्या नावाने प्रथमच 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उध्दवश्री पुरस्कारात बाळासाहेब लांडगे (क्रीडा), गोपाळ देवांग (क्रीडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब क-हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रीडा), कैलास पुरी (झी वार्ताहार), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखापाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (सरस्वती शिक्षण मंडळ, संस्थापक), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक) आदींना गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रसिध्द अभिनेते जॉनी लिव्हर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला  अध्यक्ष माधव मुळे, कामगार नेते व पुरस्कार समितीचे निमंत्रक इरफान सय्यद, शिवसेनेच्या महिला संघटिका सुलभा उबाळे, सचिव गुलाब गरुड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.