BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : कबड्डी सराव करणार्‍या खेळाडूंना गणवेशाचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत कबड्डी खेळाचा सराव करणार्‍या मुला मुलींना कबड्डी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रमेश पाळेकर यांच्या वतीने गणवेशाचे (किट) वाटप करण्यात आले. पावसाळ्यात देखील ही मुले प्रियदर्शिनी संकूल याठिकाणी कबड्डी खेळाचा मॅटवर सराव करतात. लोणावळा व मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड व पुणे भागातून देखील काही मुले सरावाकरिता येथे येतात.

मावळ तालुक्यातील मुला मुलींमध्ये कबड्डी या खेळाची आवड निर्माण व्हावी व मावळ तालुक्यातून चांगल्या प्रकारे खेळाडू तयार व्हावेत. या उद्देशाने मावळ तालुका कबड्डी असोसिएशनची स्थापना वर्षभरापूर्वी करण्यात आली. आज असोसिएशनच्या माध्यमातून जवळपास 80 खेळाडू सराव करत आहेत. नुकत्यात झालेल्या लिग कबड्डी स्पर्धेत देखील काही जणांना बालेवाडी येथे खेळण्याची संधी मिळाली, येत्या काळात मुंबईत होणार्‍या व्यावसायिक कबड्डी खेळाकरिता तसेच दौंड व निमगाव धावडी येथे होणार्‍या स्पर्धांमध्ये  मावळचा संघ सहभागी होणार आहे. मुलांना कबड्डी खेळाचे उत्तम प्रशिक्षण देण्यावर असोसिएशनचा भर असणार असल्याचे या किट वाटप सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष रमेश पाळेकर व उपाध्यक्ष किरण गायकवाड यांनी सांगितले.

रमेश पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष किरण गायकवाड, असोसिएशनचे सचिव विलास जाधव, खजिनदार विशाल विकारी, संचालक महेश मसणे, दीपक राक्षे, प्रफुल्ल पाळेकर, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू उल्हास पाळेकर, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र कल्याणजी, संतोषी तोंडे, शकिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.