Talegaon : नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 ते 7 व  माध्यमिक शाळा क्र. 2 व 6 मधील सर्व विद्यार्थ्यांना वर्ष 2019-20 साठी शिक्षण व सांस्कृतिक कार्य समितीतर्फे गणवेश वाटप करण्यात आले. नगरपरिषद लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक-३ येथे हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीच्या सभापती कल्पना भोपळे यांनी केले. विद्यार्थ्यांना गणवेश दरवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत मिळतात. परंतु या शैक्षणिक वर्षात काही तांत्रिक अडचणींमुळे गणवेश उशिरा प्राप्त झाले व विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यानंतर त्याचे वाटप करत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्‍त केली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्राची हेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका विभावरी दाभाडे, काजल गटे, नगरसेवक रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र. ३ मधील विशाखा सोनवणे, स्नेहल कांबळे, संकिता चव्हाण व भालेराव या विद्यार्थ्यांनी गणवेश मिळाल्याबाबत मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बुरांडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक किसन केंगले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.