Pune : अतिवृष्टीने बाधित पिकांची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व इतर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करण्यात येऊन मदतीबाबत आश्वस्त केले आणि त्याप्रमाणे संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांना आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.