Pune : जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशन आयोजित राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धा शनिवारपासून

१२ आणि १४ वर्षाखालील गटात १६ राज्यातून ३२ संघांचा सहभाग; ११ ते १३ जानेवारी दरम्यान स्पर्धा

एमपीसी न्यूज – मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आणि मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर शनिवारपासून (दि. ११) राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धा  होणार आहे. दिनांक ११ आणि १२ जानेवारी रोजी या स्पर्धा होणार आहेत. मे मध्ये स्पेन येथे होणा-या जागतिक मिनीफुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मिनी फुटबॉल असोसिएशनचे सचिव तकदीर सय्यद यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि ११) सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, वर्ल्ड मिनी फुटबॉलचे उपाध्यक्ष विठ्ठल शिरगावकर आणि मिनीफुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सामने होणार आहेत.

वयवर्षे १२ आणि १४ वर्षाखालील गटात १६ राज्यातील ३२ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.  दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत साखळी आणि बाद पद्धतीने सामने होणार आहेत. स्पर्धेचा समारोप १२ जानेवारी रोजी सायंकाळी  ४ वाजता होणार आहे. यावेळी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे गौरव दीक्षित उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.