Pimpri : दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा उत्साहात  

शिशुगटात पर्णवी गाडे तर खुल्या गटात रुचिका भोंडवे प्रथम 

एमपीसी न्यूज – नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच उत्साहात पार पडली. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे स्पर्धेची अंतिम तर फेरी बक्षीस समारंभ याच शाळेतील मनोहर वाढोकर सभागृहात पार पडला. 
ज्ञानप्रबोधिनीचे शिक्षण समन्वयक शिवराज पिंपुडे, नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अमित गोरखे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य कीर्ती मटंगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, स्पर्धा  प्रमुख माधुरी ओक आणि अनुराधा कुलकर्णी उपस्थित होत्या. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून पुष्कर देशपांडे, संध्या कुलकर्णी, दिपाली निरगुडकर आणि माधुरी गुळवेलकर यांनी जबाबदारी पार पडली.
पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेची प्राथमिक फेरी 4 केंद्रांवर 5 ऑगस्ट रोजी पार पडली होती. प्राथमिक फेरीत 500 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नाट्यछटा स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील 93 अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. स्पर्धेची प्राथमिक फेरी 6 वेगवेगळ्या गटात झाली. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि ज्येष्ठांच्या गटाचा समावेश होता.
पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेचं यंदाचं हे चौथे वर्ष आहे. स्पर्धकांचा वाढता उत्साह पाहता यावेळी सिटी प्राईड, प्राधिकरण हे एक जास्तीचं केंद्र जाहीर करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड विभागातील प्राथमिक फेरी 1. अविष्कार बालभवन, चिंचवड 2. मधुश्री कलाविष्कार, निगडी 3. भारतीय जैन संघटना विद्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी 4. ब्लू रीड्ज पब्लिक स्कूल, हिंजवडी या चार केंद्रांवर पार पडल्या.
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा यापूर्वी फक्त पुणे विभागातून पार पडायच्या. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील केवळ अनेक केंद्र या स्पर्धेमध्ये सहभागी होत असत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धकांचा वाढता उत्साह आणि वाढती संख्या पाहता हा विभाग स्वतंत्र विभाग म्हणून चार वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आला. नाट्यछटा हा प्रकार सध्या केवळ मराठीत नाट्यसंस्कार कला अकादमीनेच सुरु ठेवलेला आहे. दिवाकरांच्या नाट्यछटा आजच्या आणि पुढच्या पिढीलाही प्रेरणादयी ठरतील, व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत होतील म्हणूनच या विचाराने 1992 या वर्षापासून नाट्यसंस्कार कला अकादमीने कै.दिवाकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने “कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेला” सुरुवात केल्याचे नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सांगितले.
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा अंतिम निकाल :
शिशुगट : प्रथम – पर्णवी गाडे, द्वितीय – आत्मज सकुंडे, तृतीय – अर्जुन नरवडे, उत्तेजनार्थ – अरुंधती सुरवडे, श्रीदा वैद्य

इयत्ता पहिली / दुसरी : प्रथम – तन्वी हरीप, द्वितीय – रिया मेहता, तृतीय – ईश्वरी निकम, उत्तेजनार्थ – आदित्य जोशी
इयत्ता तिसरी / चौथी : प्रथम – सान्वी भाके, द्वितीय –  अंतरा पाटील, तृतीय – शर्वरी भोंगाळे, उत्तेजनार्थ – अभिव्यक्ती मदने, श्वेतांबरी राहणे, मानस झेंडे
इयत्ता पाचवी / सहावी : प्रथम – श्रीहरी अभ्यंकर, द्वितीय – तनिष्का बहुलकर, तृतीय – वरदा फाटक, उत्तेजनार्थ – सरगम कुलकर्णी, गायत्री काळे, प्रज्ञा देशपांडे
इयत्ता सातवी / आठवी : प्रथम – मल्हार देशपांडे, द्वितिय – ओम तळपे, तृतीय – शंतनू नातू, उत्तेजनार्थ – अर्थव कुलकर्णी
इयत्ता नववी / दहावी : प्रथम – केतकी मोरये, उत्तेजनार्थ – अनया फाटक खुला गट : प्रथम – रुचिका भोंडवे, द्वितीय – मोनिका बोरसे, उत्तेजनार्थ – मंजिरी भाके
लेखन विभाग :
पालक : प्रथम – सौ. तृप्ती सकुंडे, द्वितीय – सौ. सुनीता आचार्य
शिक्षक : प्रथम – सौ. जयश्री कुलकर्णी, द्वितीय – सौ. अनघा दिक्षित
विद्यार्थी : प्रथम – स्नेहल भालेराव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.