Pune : रसिक ‘संस्थेतर्फे संगीत, नृत्याचा वैविध्यपूर्ण आविष्कार

एमपीसी न्यूज – ‘रसिक ‘ संस्थेतर्फे संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन ‘कॅलिडोस्कोप’ या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल  शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुफी संगीत, गझल,सीने संगीत असे वैविध्यपूर्ण आविष्कार ‘कॅलिडोस्कोप’मधून अनुभवता येणार आहेत.

रामदास पळसुले (तबला), अमर ओक (बासरी), प्रथमेश लघाटे (गायन), हर्षला वैद्य (कथक), रोहन वनगे (वेस्टर्न ऱ्हीदम), निषाद वैद्य (सिंथेसायझर) यांचा या सांगितिक मैफिलीत समावेश आहे. अरूणा अनगळ सूत्रसंचालन करणार आहेत.

हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे ५ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.