Divya Joshi: घरच नाही तर तिरंगा लावू कुठे ? तरुणीचा थेट मुख्यमंत्री व पंतप्रधानांना सवाल

एमपीसी न्यूज : मलाही माझ्या घरावर तिरंगा लावून हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. (Divya Joshi) पण मला घरच नाही तर तिरंगा लावू कुठे असा सवाल तरुणीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. ही विचारणा तिने मेलद्वारे केली आहे.

दिव्या अजय जोशी असे तरुणीचे नाव असून तिने लिहलेल्या मेल मध्ये म्हटले आहे की, मी दिव्या अजय जोशी अपणास विनंती अर्ज करते की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली ,म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत .आणि त्या निमित्ताने भारत सरकार “हर घर तिरंगा” नामक एक मोहीम राबवत आहे ,तर त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे.(Divya Joshi) परंतु माझी आर्थिक परिस्थिती पाहता मला तिरंगा घेणे शक्य आहे पण माझ्याकडे घर नाही त्यामुळे माननीय पंतप्रधान यांना माझी विनंती आहे की या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी आपण मला घर मिळवून देण्यात किंवा घेण्यात मदत करावी.

Ganeshotsav Competition: राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळ प्रथम 

कारण माझ्या परिवारात मी, माझी आई ,माझा लहान भाऊ आणि माझी मोठी बहीण असे चौघे जण आहोत. मी आणि माझी मोठी बहीण कमवतो पण येणाऱ्या पगारात वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की आपण मला घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करून भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे जी मोहीम राबवत आहेत.(Divya Joshi) “हर घर तिरंगा” त्यात मलाही सहभाग घेऊन भारताचा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करायचा आहे ,व मला भारताची मान उंचावण्यासाठी प्रोत्साहन करावे अशी नम्र विनंती. दिव्याने लिहलेल्या पत्राची सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.