Maval News : ‘दिव्य काशी, भव्य काशी’ लोकधामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण, वडगावमध्ये दिसणार थेट प्रक्षेपण

एमपीसी न्यूज – श्री काशी विश्वनाथांच्या ‘दिव्य काशी, भव्य काशी’ या ऐतिहासिक लोकधामाचे लोकार्पण सोमवारी (दि.13) सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा लोकार्पण सोहळा दूरदर्शनवर लाईव्ह असल्याने त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण या ठिकाणी करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची अभूतपूर्व संधी मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायाला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन मावळ भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुनील महाराज वरघडे व कार्यक्रम प्रभारी अनंता कुडे यांनी दिली.

 या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ह भ प शंकर महाराज मराठे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, पंढरपूर बांधकाम समितीचे अध्यक्ष माऊली शिंदे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे आदींसह तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.