Diwali 2023 : जाणून घ्या यंदाच्या दिवाळीचे मुहूर्त!

एमपीसी न्यूज : – दिवाळी अगदी उद्यावर येऊन ठेपली (Diwali 2023) आहे. दिवाळीची सगळी खरेदी झाली आहे…फराळ सुरू आहे मग दिवाळीच्या पुजेविषयी आणि मुहूर्ता विषयी ही जाणून घ्या …

रमा एकादशी अश्विन कृष्ण 11. दि.9 नोव्हेंबर (गुरुवार) सायंकाळी दारासमोर तेलाचे दिवे लावावेत. रोषणाई करावी..

वसु बारस सुर्यास्ताचे वेळी गाईचे वासरासह (सवत्स गाय) पुजन केले जाते. गाईला उडीद वडयाचा नैवेद्य दाखवावा व खाण्यास द्यावे. त्या दिवशी गाईचे दूध व तळलेले पदार्थ खाऊ नयेत. (दुधजन्य पदार्थ) वर्ज्य करावे.

गुरु द्वादशी: अश्विन कृष्ण 12. दिनांक 10 नोव्हेंबर (शुक्रवार)

धनत्रयोदशी अश्विन कृष्ण 13. दि.10 (शुक्रवार) वेळ दुपारी 4.33 मि ते 5.34 मी. चंचल 9.20 ते 10.43 मिनिटे लाभ

यमदिपदान अश्विन कृष्ण 13 दि.10 नोव्हेंबर (शुक्रवार) यादिवशी कणकेचा दिवा करून घराच्या दक्षिण दिशेला ज्योती करून लावून ठेवावा. दिव्याची पुजा करावी व पुढील श्लोक म्हणून दक्षिणेला तोंड करून यमदेवतेला नमस्कार करावा. त्यामुळे (Diwali 2023) अपमृत्यु टळतो.

मृत्युनां पादाभ्या कालेन श्यामपासह |

प्रयोमा दीपदानात सुर्वण प्रतिता नम |

नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान अश्विन कृष्ण 14. दिनांक 12 (रविवार) यादिवशी चंद्रोदयीचे वेळी पहाटे 5 वाजून 33 मी. सुगंधी तेल व उटणे अंगाला लावून अभ्यंग स्नान करावे. पिता असणाऱ्या व्यक्तीनी पाण्यात अक्षता टाकून स्नान करावे व इतरांनी पाण्यात तिळ टाकून स्नान करावे.

ITI : शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यास मुदतवाढ

स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमदेवतेला पुढील चौदा (14) नावांनी अर्ध्य द्यावे.

1. यमाम नमः यमं तर्पयामि । 2. धर्मराजाय नमः धर्मराज तर्पयामि 3. मृत्यवे नमः मृत्यूं तर्पयामिन। 4. अन्तकाय नमः अन्तंक तर्पयामि 5. वैवस्वताय नमः वैवस्वतं तर्पयामि 6 कालाय नमः कालं तर्पयामि 7. सर्व भुतक्षतक्षयं नमः सर्वभूतक्षयं तर्पयामि 8. औदुंबराय नमः औदुंबर तर्पयामि 9. दघ्नाय नमः दघ्न तर्पयामि 10 नीलाय नमः नीलं तर्पयामि । 11. परमेष्ठिनें नमः परमेष्ठिनं तर्पयामि । 12 वृकोदरायः वृकोदरं तर्पयामि । 13 चित्राय नमः चित्रं तर्पयामि । 14. चित्र गुप्ताय नंतर दक्षिणेकडे तोंड करून (Diwali 2023) पुढील श्लोक दहा वेळा म्हणावा. त्यामुळे आयुष्यवृद्धी होते.

यमो निहंता पितृधर्मराजों वैवस्वतो दंडधरश्च कालः ॥

भूताधिपोदत्त कृपानुसारी कुतांत एतत्शिर्भिर्जपती॥

लक्ष्मी कुबेर पुजन (दिपावली) : अश्विन कृष्ण 30 दि.12 (रविवार)

वेळ दुपारी 2.50 ते 3.10 पर्यंत

सायंकाळी 5.45 ते 7.33 पर्यंत

सायंकाळी 7.45 ते 9.05 पर्यंत (7.45 ते 8 पर्यंत अमृत)

रात्री 9.10 ते 10.45 पर्यंत (चंचल)

वरील शुभदायक कालावधी राहील.

दीपपूजा व दीपदान केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होती.

अन्नकूट गोवर्धन पुजन: कार्तिक शुल्क 1 दि.14 (मंगळवार) विविध मिठाई व भाजीपाला व पुरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. व गायीची पुजा करून अन्नकुटाचा नैवेद्य करून देवाला अर्पण केला जातो.

कार्तिक शुल्क दि.14 (मंगळवार)

बलिप्रतिपदा | वहीपूजन | दिपावली पाडवा पतिस ओवाळणे.

वहीपूजन पहाटे 2.30 ते 5 पर्यंत शुभ

1) सकाळी 9.30 ते 10 पर्यंत चंचल

2) वेळ सकाळी 11 ते 12.10 पर्यंत लाभ

3) वेळ दुपारी 12.20 ते 9.45 पर्यंत अमृत

पाटावर बलीची प्रतिमा तांदुळाने काढून त्याची पुजा करावी. जमाखर्चाच्या नविन खरेदी केलेल्या वह्याची पूजा करून लिखाणास सुरुवात करावी. या दिवशी पहाटे स्त्रियांनी पतीला अभ्यंगस्नान घालून ओवा व मिष्ठान्नाने भोजन करावे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानानंतर नरकचतुर्दशीला मागितल्याप्रमाणे चित्रगुप्त व प्रमदुतसह यमदेवतेचे तर्पण करावे. यामुळे आयुष्यवृद्धी होते.

यमद्वितीया | भाऊबीज कार्तिक शुल्क 2 दि.15 (बुधवार) या दिवशी बहिणीकडून अभ्यंगस्नान कराये व बहिणीला भेटवस्तु द्यावी.

तुलसी विवाह कार्तिक शुल्क 13. दि 24 ते 27 या काळात सुर्यास्ताचे वेळी तुलसीचा श्रीकृष्णाबरोबर विवाह लागण्याची पद्धत आहे.

वैकुंठ चतुर्दशी कार्तिक शुल्क 14 दिनांक 26 , वार रविवार या रात्री आवळीच्या झाडाखाली श्री विष्णुचे तुलसीपत्राने पुजन करावे व पहाटे सुर्योदयाचे वेळी सहस्त्र बिल्वपत्राने श्रीशियाचे पुजन करावे

त्रिपुरारी पौर्णिमा – कार्तिक शुल्क 15. दि. 26 सायंकाळी सूर्यास्तानंतर 750 त्रिपुर वाती आवळयावर लावाव्यात. या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला म्हणून वाती लावून दीपोत्सव साजरा करतात.

कार्तिक स्वामी दर्शन पुजन – यावर्षी कार्तिक शुल्क 14 रविवार दि.23 रोजी दुपारी 3.54 ते 27 वार सोमवार दुपारी 1.35 मि पर्यंत पौर्णिमा व कृतिका नक्षत्र येत असल्यामुळे या योगावर कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे

कृतिका नक्षत्र असल्याने या योगवर कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे. प्रथम स्नान करून स्वामीचे दर्शन घेऊन दर्भ चंदन फुले दाग दीप अर्पण करून कार्तिक यांचे वाहन मयुर याची पूजा करावी. वर्षातील या एकाच दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते. यादिवशी कार्तिक स्वामींची विधीत पुजा केल्याने कुबेरासारखी सपती मिळते.

ज्योतिषभास्कर उमेश स्वामी

– संपर्क क्रमांक – 9922311104

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share