Diwali : सोहम ग्रंथालयातर्फे साफसफाई कामगारांना व नर्स यांना कपडे व फराळ वाटून दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज – सोहम सार्वजनिक ग्रंथालयात कचरा उचलणाऱ्या ‘ह’ प्रभागातील साफसफाई करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना कपडे व फराळ वाटप करून दिपावली मोठ्या उत्साहात (Diwali) साजरी करण्यात आली.

संत तुकाराम नगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयात कचरा उचलणारे व साफसफाई करणारे कर्मचाऱ्यांना बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल विद्या शेखर भाले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा यांच्या हस्ते ज्योती भालेराव, संगीता भिसे, शंकर शेंडे, खाजापपा गायकवाड तुळसाबाई प्रधान, सुनीता गायकवाड, सुरेश सनक, चंद्रकला लहाने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा महिलांना साड्या व पुरुषांना पॅन्ट शर्ट व फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले साफसफाई (Diwali) करणारे कर्मचारी रोज वेगवेगळ्या भागात कचरा उचलून स्वच्छता ठेवतात अशा व्यक्तींची समाजात योग्य ती दखल घेतली पाहिजे. आपला सण उत्सव साजरी करत असताना त्यांनाही आपले आनंदात सहभागी केले पाहिजे व आदराची वागणूक दिली पाहिजे. शहरातील साफसफाई करणारे कर्मचारी व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स या खऱ्या अर्थाने देवदूत आहेत.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांनी संस्थेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आता काळ व अभ्यासक्रम बदललेला आहे. ते ओळखून आपण प्रयत्न केले पाहिजे. सातत्य व चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अपयश आले तरी निराश न होता प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला पाहिजे.  सोहम ग्रंथालयात असलेल्या ग्रंथांचा समाजाने लाभ घेतला पाहिजे. कार्यक्रमाला प्रकाश ब्राह्मणकर, काशिनाथ तागड तसेच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. प्रदीप बोरसे यांनी आभार मानले. ग्रंथालयाचे ग्रंथपाल वर्षा बोरसे व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

https://www.youtube.com/watch?v=a-ColLCgpns

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.