Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव! 

Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव!
एमपीसी न्यूज – यमुनानगर सहयोग फाऊंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील रेटवडी (ठाकरवाडी) या दुर्गम
भागात जाऊन तेथील लोकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून त्यांना फराळ , महिलांना साड्या, आकाशकंदील वाटप करून त्यांच्या समवेत दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
_MPC_DIR_MPU_II
मागील 16 वर्ष यमुनानगर मधील सहयोग फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. समाजात समरसता आणण्याच्या प्रयत्नाने हा उपक्रम राबवला जातो. प्रत्येक वर्षी एका वेगळ्या दुर्गम ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून, त्यांना फराळ वाटप केला जातो. यमुनानगरमधील नागरीक स्वतः जाऊन त्या भागात भेट देतात व उपक्रम राबवतात.
या उपक्रमात अनिल (अण्णा) अढी, नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी, धनाजी शिंदे, अजय म्हाळस, विकास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, गोविंद लाठकर, सुभाष सराफ, संतोष समुद्र, मंगल महाराज जगताप, गजानन ढमाले, पराग सहस्त्रबुद्धे, दीपाली धानोरकर, नलिनी वाणी, सौ. पाटील आदी सहभागी होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.