Pimple Gurav : आधी आरोग्य कर्मचार्‍यांची दिवाळी, मग आपली !

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्य कर्मचार्‍याना साडी, कपडे, मिठाई वाटप  

एमपीसी न्यूज –   ऊन, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता परिसर स्वच्छता करण्याचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून, सार्वजनिक स्वच्छता ठेवणार्‍यांचा सन्मान व्हायला हवा, या उद्देशाने मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त आरोग्य कर्मचार्‍यांना साडी, कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्य कर्मचार्‍याना साडी, कपडे, मिठाई वाटप  , ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प. शिवानंद महाराज यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

पिंपळे गुरव येथील ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिव सूर्यकांत कुरुलकर, माधव मनोरे, भैरुजी मंडले, अदिती निकम, नितीन चिलवंत, मुंजाजी भोजने, बळीराम माळी, पंडित किनीकर, अभिमन्यु गाडेकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, प्रभाकर साळुंके, अनिसभाई पठाण, महादेव बनसोडे, विजय सोनवणे, मारुती बानेवार, दिनेश गाडेकर, किसन फसके, बिरु व्हनमाने, बाळासाहेब काकडे, हरिभाऊ पाटील, सुनिल काकडे, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरीक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य, केशव बोदले, उमाकांत तळवडे, किशोर आटरगेकर, मल्लपा म्हेत्रे, अशोक पाटील, अंकुश बिरादार, राजेश गाटे, संतोष आरगुलवाड, विजय वडमारे आदी उपस्थित होते.

बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, सण-उत्सवांच्या काळात स्वच्छता कर्मचार्‍यांची खरी परीक्षा असते. स्वत:च्या घराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता हे ते दिव्य पार पाडतात. जेथे स्वच्छता असते, तेथेचे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे इथल्या स्वच्छतेचे श्रेय स्वच्छता कर्मचार्‍यांना जाते. त्यामुळे अरुण पवार यांनी या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून दीनदुबळ्याची सेवा केली आहे. दिवाळी सर्वजन साजरी करतात, पण जे खरे कष्टकरी असतात, त्यांची दिवाळी अगोदर साजरी झाली पाहिजे, असा उद्देश ठेवून अरुण पवार अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असतात. समाजातील
एकनाथ पवार म्हणाले, दिवाळीसारख्या सण-उत्सवाच्या काळात स्वत:च्या घरापेक्षा शहराच्या विविध भागात सफाई करणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.

दरम्यान, सुनील काकडे यांची ह्युमन राईट फोरमच्या पुणे जिल्हा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच बिदर जिल्हा मित्र मंडळातर्फे पाठविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप कामगारांच्या मुलांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर सूर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.