Pimpri : दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीचा उत्साह

एमपीसी न्यूज – रस्त्यांवर दुतर्फा गर्दी, दुकानांमध्ये झुंबड, मॉल्समध्ये रांगा… दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असताना खरेदीचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. रविवारचा दिवस त्यासाठी ‘आदर्श’ ठरला! आकाश कंदिलांपासून रांगोळ्या, कपडे, फटाके, फराळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी  पिंपरी-चिंचवड शहरात गर्दीचेच दृष्य दिसत आहे.

रंगबिरंगी कपडे, नवीन पद्धतीच्या पणत्या, एकापेक्षा एक रंगसंगती आणि आकारांचे आकाशकंदील, आवाजाचे आणि बिन आवाजाचे फटाके, तयार फराळ्यांला असलेली वाढती मागणी आणि हलकेच पुस्तकांच्या दुकांनांत दिवाळी अंकावरही ओझरती नजर असाच माहौल सर्वत्र होता.  फटाक्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.शिवाय मोबाइलवरही एसएमएसने ऑफर्सची माहिती दिली जात आहे.रविवारी सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून खरेदीसाठी गर्दी होती.

सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने येथे दिवसभर गर्दी होती. सायंकाळनंतर तर त्यामध्ये आणखीनच वाढ झाली.मुहूर्तावर घेऊन जाण्यासाठी चारचाकी, दुचाकींचे बुकिंग सुरू आहे. ग्राहक विविध कंपन्यांचे वाहनांची माहिती घेत आपल्याला हवे ते वाहन बूक करीत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी केली जाते. टीव्ही, फ्रीज, कम्युटर, मोबाइल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन्सला मागणी आहे.दिवाळीच्या दिवशी अंघोळ करण्यासाठी सुंगधी साबण, उटणे, अत्तर, आकाश कंदील असे साहित्यही घेतले जात आहे.मोबाईल, सोशल नेटवर्किंगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रीटिंग्ज कार्डसना पसंती दिली जात आहे.

दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारात विविध जातींची फुले दाखल झाली असून, यामुळे बाजारपेठ दरवळली आहे. दिवाळीच्या पर्वावर गुलाब, झेंडू, मोगरा, चमेली यांसारख्या स्थानिक फुलांबरेबरच विदेशी जरबेरा, ऑर्किड, कार्निशा या फुलांनाही ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.व्यापारी, दुकानदार, मंदिरे, अपार्टंमेंटवर सुशोभ‌िकरण करण्यासाठी झेंडू, गुलाबाच्या फुलांच्या हारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे फुल विक्रेते ऑर्डरप्रमाणे हार बनवून देतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.