BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी साडेआठपर्यंत मुहूर्त

एमपीसी न्यूज – लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी करायचे असते. लक्ष्मीपूजन करण्यासाठी बुधवारी (दि. ७) प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी ६.०२ मिनिटांपासून ते रात्री ८.३५ मिनिटापर्यंत शुभमुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते उमेश स्वामी यांनी दिली. या वेळी लक्ष्मीचे प्रतीक असणा-या झाडूची पूजा करण्याची प्रथा असल्याचे  यांनी सांगितले.

लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर  मंगळवारी पूजा साहित्य व विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती. लक्ष्मीच्या मूर्ती, झेंडू व शेवंतीची फुले, मिठाई व फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती.

तसेच बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुरुवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 10 ते 8 मिनिटांनी शुभ, सकाळी अकरा ते दुपारी तीन, अमृत आणि दुपारी 12  ते 2.00 मिनिटे शुभ या चौघडीमध्ये वहीपूजन व लेखनास प्रारंभ करावा, असे  यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3