Pimpri : दिवाळी पहाट निमित्त चिंचवड करांना स्वरबहार कार्यक्रमातून सुरेल गाण्यांचा नजराणा

एमपीसी न्यूज – दिवाळी पहाट निमित्त सोहम योग साधना आणि फोरम फॉर म्युझिक फाउंडेशन चिंचवड प्रस्तुत स्वरबहार हा मराठी व हिंदी गीतांचा सुरेल कार्यक्रम चिंचवड येथे झाला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, नगरसेविका अपर्णा डोके, निलेश डोके, सुरेश भोईर, उद्योजक रवी नामदे, मारुती बहिरवडे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.

चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे परीक्षागृह डागडुजीनंतर आकर्षकरित्या प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले आहे. प्रेक्षागृहात डागडुजीनंतरचा हा पहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात पहिले नमन, पूछो ना कैसे, बाहो में चले, ए मेरी जोहराजबी, चूप गये सारे, शुक्राची चांदणी, हृदयी वसंत, तेरे मेरे मिलन, निगाहे मिलाने को, परदे में रहने दो, नमोस्तुते यांसारखी भावगीते, भक्तिगीते कलाकारांनी सादर केली. अक्षय घाणेकर, ईशानी कुलकर्णी, धनश्री हेबळीकर, श्रुष्टि जोशी, विजय जांभेकर, वासुदेव केळकर आदींनी गायन केले. विजय कापसे यांनी वाजविलेल्या ढोलकीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली.

कार्यक्रमाचे संयोजन दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर यांनी तर संगीत संयोजन मंदा ढुमणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती देशपांडे यांनी केले. रश्मी उचगावकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.