Diwali News : किवळे-विकासनगर येथे किल्ले बांधा स्पर्धा

एमपीसीन्यूज : किवळे-विकासनगर परिसरातील बाळगोपाळांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या महापराक्रमी इतिहासाची उजळणी व्हावी,  या हेतूने श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने किल्ले बांधा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा फक्त किवळे आणि विकासनगर या भागासाठी असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी दिली.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना तरस म्हणाले, स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2222, 1111 आणि 777 रुपये रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत 20  वर्षांखालील मुलांना प्रवेश घेता येईल. त्यासाठी इच्छुकांनी 9822132069  या व्हाटसअँप क्रमांकावर स्वतःचे नाव, संपूर्ण पत्ता आणि स्वतः तयार केलेल्या किल्ल्याचा फोटो पाठवावा, असे आवाहन आयोजक राजेंद्र तरस यांनी केले आहे.

सध्या मोबाईलचा जमाना असल्याने अबालवृद्ध मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे लहान मुलेही मोबाईलच्या आहारी गेल्याचे पहायला मिळते. अशा मुलांचे मोबाईलचे वेड कमी करून त्यांच्यात इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांच्या तेजस्वी इतिहासाची ओळख मुलांना व्हावी, या उद्देशाने किल्ले बांधा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला बालगोपाळांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. राजेंद्र तरस – संस्थापक अध्यक्ष, श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.