-MPC-TOP-MOST-BANNER-I

Diwali Vacation : शाळांना उद्यापासून 14 दिवस दिवाळीची सुट्टी ; विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीनंतर केला बदल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत 14 दिवसांसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

पाच नोव्हेंबरमधील परिपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn