Mumbai News: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, तीन महिन्यांचे पूर्ण थकीत वेतन मिळणार

Diwali will be sweet for ST employees, they will get full three months salary.

एमपीसी न्यूज – एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.