Mulashi News : मुळशीतील वनवासी कुटुंबासोबत दिवाळी

अभाविपचा अनोखा सेवा उपक्रम

 एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील माले या डोंगराळ भागात असलेल्या गावात भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. कोरोना संसर्ग आणि शहरी भागाशी फारसा संपर्क नसलेल्या या गावात ‘अभाविप’ने अनोखा सेवा उपक्रम राबविला. 

 

याप्रसंगी कुटुंबाना दिवाळी फराळ भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच कपडे आणि शिधा वाटप करण्यात आले. गावातील नागरिकांना कायम मास्क परिधान करणे व हात वेळोवेळी धुण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना संसर्गापासून बचावासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे अशी सूचना करण्यात आली.

 

याउपक्रमासाठी पिंपरी चिंचवड नगर विस्तारक अशोक सैनी,ज्योतिष चौधरी, पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सह संयोजक ऋषि विढोळे, महानगरमंत्री तेजस चवरे, मुळशी तालुका प्रमुख ओमकार जमादार,संभाजी शेंडगे, दामिनी प्रधान, वैभव बिरंगल, मानसी जाधव आदी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.