Pimpri : अंधांच्या चेह-यावरील आनंदात दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

साद सोशल फाउंडेशनच्या वतीने अंधांना दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज – सर्वसामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. अंधांच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.  दिवाळी हा दिव्यांचा उत्सव हा उत्सव सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. समाजातील अंध  बांधवांच्या जीवनात ही दिवाळी असाच प्रकाश घेऊन यावी, यासाठी साद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला, असेही सय्यद म्हणाले.

आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार अनिल कातळे, संजय सोलंकी, अतिश बारणे, हसनभाई शेख, डॉ. शाम अहिरराव, किसन बावकर, अरविंद सोलंकी, प्रमोद मामा शेलार, प्रदीप धामणकर, पांडुरंग कदम, आप्पा कौदरे, अमित जैन, कर्नल पी व्ही आर सुब्रमन्यम, दिलीप सोंळकी, जरीनभाई शेख, किशोर जैद, संतोष जाधव, संतोष साळुंखे, निरंजन अग्रवाल, रमेश चौधरी, संजय शिंदे, जितु जैन, दिनाकर शेट्टी, ङाॅ महेश शेटे, प्रदिप धामणकर, संदिप मधुरे, रवि घोडेकर, सुनिल जाधव, मारूती कौदरे, प्रल्हाद खेडेकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.    आदी उपस्थित होते. दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात एक हजार अंध कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

साद सोशल फांडेशनच्या वतीने गेली आठ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप हे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना सर्वात जास्त समाधान होत असल्याचे सांगून समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत हे ख-या अर्थाने समाजऋण फेडण्याचे काम आहे, असेही सय्यद यांनी सांगितले.  मागील सात वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही अंध बांधवांच्या आशीर्वादाने व सहकारी मित्र यांच्या सहकार्याने राबवत आहोत. ह्या बांधवांनी दिलेले आशिर्वाद हीच माझी उर्जा आहे. ज्या उर्जेमुळेच मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. अंध कुटुंबियांच्या चेह-यावरील पाहिलेला आनंद हा चिरकाल राहण्यासाठी साद सोशल फाऊंडेशनचे सर्व सहकारी सतत प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करता करता समाजातील अंध बांधवांच्या चेह-यावरसुद्धा हसु किंवा आनंद देण्यासाठी इरफानभाई यांनी गेल्या सात वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा, अशा शब्दांत अनिल कातळे यांनी मत व्यक्त केले.

अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटपाबरोबरच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळाली पाहिजे. तसेच या बांधवानी बनवलेली वस्तू यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून या बांधवांकरीता दिवाळीच्या आधी एखाद्या प्रदर्शनाचे आयोजन इरफानभाई यांनी करावे, असे मत ङाॅ श्याम अहिरराव यांनी मांडले.

साद सोशल फांऊङेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद आणि महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी करण्यासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याचा 600 बांधकाम कामगार लाभ घेणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव कचरे यांनी केले. आभार प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. महेश शेटे, प्रवीण जाधव, परेश मोरे, राहूल कोल्हटकर, अनिल दळवी, नागेश व्हनवटे, अरुण जोगदंड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.