Chinchwad : संस्कारची दिवाळी आदिवासी आणि कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांसोबत

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानतर्फे  दरवर्षीप्रमाणे गडचिरोली येथील आदिवासी बांधवांना तसेच हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला आणि डॉ. विकास आमटे यांच्या आनंदवन येथील कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे.

आपल्या घरातील साखर, रवा, मैदा, डालडा, जेमिनी तेल, उटणे, साबण, बिस्किट पुडे, तांदूळ, विविध डाळ, आकाश कंदिल, पणत्या, शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, मिठाई तसेच जुन्या साड्या आणि ड्रेस धुऊन इस्त्री करुन किंवा लग्न समारंभात आलेल्या साड्या इत्यादींचे वाटप करून दिवाळी साजरी केली जाणार आहे.

वरील साहित्त्य १०ऑक्टोबरपर्यंत आणून द्यावेत कपड्यांबरोबर वरील कोणतेही एक साहित्त्य डॉ. मोहन गायकवाड साठे कॉलनी वाल्हेकरवाडी रोड चिंचवडेनगर, चिंचवड पुणे ३३, संपर्क ९९२२४२६०३१/९९२२४२६०३२ यांच्याकडे द्यावे संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना विनंती आहे. हे साहित्त्य २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान वाटप केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.