Pimpri : शहरातील ‘हा’ परिसर सील

Dange chowk, Bhosari area sealed due to increased number of COVID-19 patients.

एमपीसी न्यूज – शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शनिवारी 46 तर रविवारी दिवसभरात 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील काही परिसर सील करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल आज, रविवारी (दि. 24) सायंकाळी आला आहे.

रविवारी सकाळी भोसरी येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दिवसभरात शहरातील एकूण 42 जणांना लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खालील भाग सील करण्यात आला आहे.

# डांगे चौक, वाकड येथील (पंडित शोरुम – ओरिएंटल किचन हॉटेल – डांगे चौक रोड – प्रतिभा मोटर्स – पंडित शोरुम ) व शास्त्री चौक

# भोसरी येथील (बंधन बँक – अजय डिस्ट्रिब्युटर्स – हॉटेल शांघाई – एच.डी.एफ.सी बँक एटीएम – श्रेयस मेडिकल – बंधन बँक) परिसर

वरील परिसर आज, रविवारी (दि. 24) मध्यरात्री 11 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.  सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.